दक्षिण गोव्यात ४२ नवीन मतदान केंद्रे निर्माण करणार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पणजी, २१ ऑगस्ट (वार्ता.) – निवडणूक आयोगाने सिद्ध केलेल्या नवीन नियमानुसार एका मतदान केंद्रामध्ये अधिकाधिक १ सहस्र मतदार असू शकतात. या नवीन नियमामुळे दक्षिण गोव्यात ४२ नवीन मतदान केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये वास्को येथे सर्वाधिक म्हणजे ८ नवीन मतदान केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी ही माहिती दिली.

नवीन नियमामुळे वास्को मतदारसंघात ८, कुडचडे मतदारसंघात ५, दाबोळी आणि सावर्डे या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ४, नावेली आणि कुंकळ्ळे मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ३, तसेच फोंडा, मडगाव, कुडतरी आणि काणकोण मतदारसंघांत प्रत्येकी २ नवीन मतदार केंद्रे होणार आहेत.