‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याची नागरिकांची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे नाव का पालटले नाही, याचाही हिंदूंना जाब विचारला पाहिजे ! – संपादक

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील नागरिकांनी शहराचे ‘अलीगड’ हे नाव पालटून ‘हरिगड’ करावे, अशी मागणी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारकडे केली आहे. ‘फिरोजाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘चंद्रनगर’ करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने राज्यातील शहर आणि जिल्हे यांची मोगलांनी दिलेली नावे पालटली आहेत. यात ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ असे नामकरण करणे, याचाही समावेश होता.