पुणे, ११ ऑगस्ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांच आणणारा इतिहास डोळ्यासमोर उभा करणारे, ऐकणार्याच्या मनात तो इतिहास खोलवर रुजवणारे आणि तो इतिहास प्रत्यक्ष जगायला शिकवणारे शिवव्याख्याते कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित येत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमांतून यापुढे विविध उपक्रम राबवून कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू, असा संकल्प विविध संघटनांनी या संकल्प सभेत केला. राजे शिवराय प्रतिष्ठान आणि परिवाराच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर सभागृहात कै. ज्ञानेश पुरंदरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध संघटनांचे मान्यवर आणि प्रमुख उपस्थित होते