समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वाढदिवसाच्या मिरवणुकीत कोरोनाचे नियम न पाळल्याचे प्रकरण

मुंबई – समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांची ८ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोवंडी येथे कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून मिरवणूक काढण्यात आली. शिवाजीनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी भेट दिलेली तलवार आझमी यांनी भर रस्त्यात हवेत फिरवली. मिरवणुकीत शेकडो जण सहभागी झाले होते. या प्रकरणी अबू आझमी आणि त्यांच्या पक्षाचे १७ कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी तलवार कह्यात घेतली आहे.