सांगली, ५ ऑगस्ट (वार्ता.) – सांगली महापालिका क्षेत्रात पुरामुळे मोठी हानी आहे. पूर आल्यानंतर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा जॅकवेल, भुयारी गटार या व्यवस्था ठप्प होतात. या सुविधा पूर्ववत् चालू करणे महापालिकेला अशक्य आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रस्ते, जॅकवेल, भुयारी गटार या कामांसाठी महाराष्ट्र सरकारने किमान २०० कोटी रुपयांचे साहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना सांगली शहरप्रमुख मयुर घोडके यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वर्ष २०१९ आणि २०२१ च्या पुरामुळे सांगलीतील मुलभूत सुविधा अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. शासनाने साहाय्य केल्यास या साहाय्यातून शहरातील किमान वरील मुलभूत सोईसुविधा सक्षमपणे उभ्या रहातील आणि सांगलीतील नागरिकांचे जीवन सुरळीत होण्यास साहाय्य होईल.