करावीस तू गुरुकीर्ती तिन्ही लोकी दिगंत ।

‘माझी मुलगी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. आर्या श्रीश्रीमाळ (वय १४ वर्षे) हिने टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या संस्कृतच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ते वाचून देवाने मला पुढील ओळी सुचवल्या.

श्री. महावीर श्रीश्रीमाळ
कु. आर्या श्रीश्रीमाळ

अव्यक्त भाव असे तिचा, कर्तेपणाचा लवलेश नसे ।
अनुसंधान राखूनी श्री गुरूंशी बोलते कसे ।। १ ।।

 

श्री गुरूंची तुजवर कृपा अपरंपार ।
आईचा असे पाठीशी भक्कम आधार ।
दिवसेंदिवस यशाला लाभे सोनेरी किनार ।। २ ।।

तव गुणांच्या समुच्चयाने व्हावे प्रेरित ।
शरणागतीने व्हावे ते अंगीकृत ।। ३ ।।

हीच प्रार्थना गुरुचरणी आता ।
व्हावीस तू संत, करावीस गुरुकीर्ती तिन्ही लोकी दिगंत ।। ४ ।।

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०२१)