अमरावती येथे पिस्तूल हातात घेऊन प्रसिद्धी मिळवणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचे निलंबन !

शस्त्र हातात घेऊन सामाजिक माध्यमांवर फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पोलीस कर्मचार्‍यांनी समाजातील गुन्ह्यांचे चिकाटीने अन्वेषण करावे, तसेच गुन्हेगारांना पकडण्यामध्ये स्वतःची शक्ती आणि शस्त्र यांचा वापर करावा, अशी जनतेची अपेक्षा ! – संपादक

पोलीस कर्मचारी महेश काळे

अमरावती – येथील पोलीस कर्मचारी महेश काळे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने पोलीस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन संवाद साधत असल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित केला. त्यात काळे यांनी हातात पिस्तूल घेतल्याचे, तसेच संवाद झाल्यावर दुचाकीवरून पुढे जात असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. हा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घेऊन काळे यांचे निलंबन केले. ‘कर्तव्यावर असतांना शासकीय गणवेश आणि शस्त्र यांचा अपवापर केला आहे’, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.