रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना श्री. जगदीश पाटील यांना आलेल्या अनुभूती

श्री. जगदीश पाटील

१. देवता आणि ऋषिमुनी यांना प्रार्थना करतांना डोळ्यांसमोर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रूप येऊन त्यांच्यात महालक्ष्मी, सरस्वती, कालीमाता, बगलामुखीदेवी, अंबामाता, भूदेवी आणि भवानीमाता यांचे दर्शन होणे

‘४.९.२०२० या दिवशी मी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. त्या वेळी मी देवता आणि ऋषिमुनी यांना प्रार्थना करत होतो. ‘हे त्रिलोकीनाथ, विष्णु भगवान, लक्ष्मीमाता, ‘या वैकुंठातील तुझे अस्तित्व आणि तुझ्यातील चैतन्य यांचा मला अधिकाधिक लाभ करून घेता यावा’, यासाठी तूच मला पात्र बनव. हे लक्ष्मीमाते, तुझे लक्ष तुझ्या बाळाकडे नाही’, असे मी म्हटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे रूप आले. मला त्यांच्यात महालक्ष्मी, सरस्वती, कालीमाता, बगलामुखीदेवी, अंबामाता, भूदेवी आणि भवानीमाता यांचे दर्शन एका पाठोपाठ होऊ लागले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून देवी मला म्हणाली, ‘माझे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे लक्ष तुझ्याकडे आहे. त्याची काळजी करू नको. तुला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून केवळ मुक्त करणार नाही, तर त्याच्याही पुढे घेऊन जाईन. माझे लक्ष आहे. माझी सर्व रूपे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंमध्ये सामावली आहेत. मी येथेच आहे. जेथे लक्ष्मी, तिथे विष्णुतत्त्व असतेच.’

२. ‘आज्ञाचक्रातून शरिरात पिवळा प्रकाश जात आहे’, असे जाणवणे

त्या वेळी ‘माझ्या आज्ञाचक्रातून शरिरात पिवळा प्रकाश जात आहे’, असे मला जाणवले. माझे ध्यान लागले होते. मला पांढर्‍या चांदण्या चमकतांना दिसत होत्या. मला शांती अनुभवायला मिळाली. मला देवता, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञता वाटली, तसेच माझे मन भरून आले.’

– श्री. जगदीश पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक