सोलापूर येथे कोरोनाबाधित मुलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर – येथे कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यामध्ये मागील १० दिवसांत ६१३ मुले कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत १८ वर्षांखालील अनुमाने १२ सहस्र मुलांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील काही दिवसांत हे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषत: जिल्हा ग्रामीणमध्ये बाधित मुलांचे प्रमाण अधिक आहे; मात्र असे असले तरी जिल्हा प्रशासन या परिस्थितीशी सामना करायला सक्षम असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले आहे.