वंदिता गुरुचरण लाभे सगुण-निर्गुण ।

सर्व साधकांच्या श्रद्धास्थानी असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरुमाऊली, गुरुमाऊली । गुरुभक्तांची सावली ।। १ ।।

गुरु साधकांचा आधार । गुरु परमेश्वर साकार ।। २ ।।

वंदिता गुरुचरण । लाभे सगुण-निर्गुण ।। ३ ।।

संसाराची माया अफाट । गुरु दाविती त्यातूनी वाट ।। ४ ।।

सोडवती तुला अलगद । देती अनुभूती सुखद ।। ५ ।।

गुरुकृपेच्या कल्पतरूतळी । शांती मनाला मिळे आगळी ।। ६ ।।

मोक्षाची तुज वाट दाविती ।
निर्भय तुज करती ।। ७ ।।

– सौ. वसुधा विजय दवंडे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. (१७.४.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक