बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री !

डावीकडे मंत्रीपदाची शपथ घेताना बसवराज बोम्मई

बेंगळुरू – भाजपचे नेते बसवराज बोम्मई यांनी २८ जुलै या दिवशी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते कर्नाटक राज्याचे २३ वे मुख्यमंत्री आहेत. राजभवनातील ग्लास हाऊस येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बोम्मई यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. या वेळी कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी त्यागपत्र दिल्यानंतर हे पद रिक्त होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी बोम्मई यांनी मारुती मंदिरात जाऊन श्री मारुतीचे दर्शन घेतले. बोम्मई हे हवेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथून निवडून आले असून ते काही काळ जनता दल पक्षातही राहिलेले आहेत. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात बोम्मई यांच्याकडे गृहमंत्रीपद होते.