उत्तरप्रदेशमध्ये संघ स्वयंसेवकाच्या मुलाचे शव झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले !

अक्षय

बागपत (उत्तरप्रदेश) – येथे एका संघ स्वयंसेवकाच्या मुलाचे शव झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. अक्षय (वय २२ वर्षे) असे त्याचे नाव आहे. ग्रामस्थांनी या घटनेस पोलिसांना उत्तरदायी ठरवत ‘पोलिसांच्या भीतीने अक्षयने हे पाऊल उचलले’, असा आरोप केला आहे. (उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! – संपादक) या घटनेनंतर शेकडो ग्रामस्थांनी अक्षयचे शव घेऊन पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी अन्य ठिकाणांहून अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले.