देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते ! – डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  

डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

पुणे,२० जुलै – देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते. शालेय आणि महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करते. त्यामुळेच अस्तित्वात असलेल्या प्रणाली आणि पदांना विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी सांगितल. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भारताचे माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर चंद्रचूड बोलत होते.

डॉ. चंद्रचूड पुढे म्हणाले की, भारत आणि जगभरातील अनेक समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, नेल्सन मंडेला यांच्यामुळे शिक्षणाचा विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळेच प्रगतीशील राजकारण, संस्कृतीची सांगड घालण्यात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.