सातारा, १७ जुलै (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ६ मासापूर्वी फेरीवाल्यांसाठी १ सहस्र ५०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले; परंतु अद्याप कोणत्याही फेरीवाल्याला अनुदान मिळालेले नाही. पुढील १० दिवसांमध्ये फेरीवाल्यांना अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी चेतावणी नगरसेवक अविनाश कदम यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ नियम २४७ अन्वये नमूद दुर्धर रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे ज्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, त्या व्यक्ती अथवा कुटुंबांना पालिकेने मान्यता दिली, तर भरपाई देता येईल, अशी तरतूद आहे.