‘१९८७ मध्ये मला प.पू. भक्तराज महाराज (बाबा) ‘गुरु’ म्हणून लाभले. तेव्हापासून माझ्या मनामध्ये इतर विषयांचे विचार यायचे नाहीत. त्यामुळे एखाद्याशी बोलणे संपले की, त्याच क्षणी माझा नामजप चालू होत असे. हे सर्व प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे साध्य झाले.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या इच्छेसाठी (सकाम उद्देशाने) कुणी साधना करत असल्यास साधनेमुळे त्याच्या मनातील ती इच्छा गेल्यावर ‘त्याची वासनापूर्तीसाठी साधना होत नाही’, तर आनंदप्राप्तीसाठी साधना होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |