अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्तुत्य उपक्रम !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला

सांगली, १५ जुलै (वार्ता.) – ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ ते ९ जुलै या कालावधीत परिषद की पाठशाला हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत बालवाडी ते ४ थी या वयोगटाला गाणी, खेळ, बोधकथा घेण्यात आले, तर ५ वी आणि वरच्या वर्गाला पाढे, वर्ग, घन, गणितीय आकडेमोड, सूर्यमाला, व्यक्तिमत्व विकास, मराठी व्याकरण, परिसर ओळख, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रार्थनेने प्रारंभ, थोड्या गप्पा-गोष्टी, व्यावहारिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर मार्गदर्शन, त्यानंतर पारंपरिक खेळ अन् पसायदानाने समारोप असे, या पाठशाळेचे स्वरूप होते. जिल्ह्यात सांगली नगर (हरिपूर, गावभाग), मिरज नगर, विश्रामबाग नगर, कुपवाड नगर, माधवनगर, कवठेसप्तर्षी, तासगाव, शिरोळ या ठिकाणी  हा उपक्रम राबवण्यात आला. यात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिंनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून मार्गदर्शन केले.

सदर उपक्रमासाठी जिल्हाप्रमुख प्रा. गुरु वाणी, जिल्हा संयोजक जयदीप पाटील, ऋषिकेश पाटील, दया उगले, माधुरी लड्डा, बाहुबली छत्रे, ऋषिकेश पोतदार, महानगर अध्यक्ष प्रा. सुभाष मालगावे, महानगर मंत्री विशाल जोशी यांसह अन्य जणांना सहभाग नोंदवला.