उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्विका मयूर वाघमारे एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
आषाढ शुक्ल पक्ष चतुर्थी (१४.७.२०२१) या दिवशी चि. अद्विका मयूर वाघमारे हिचा चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. अद्विका वाघमारे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
(‘वर्ष २०१८ मध्ये चि. अद्विका हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
सौ. सुलभा लोंढे (आजी (आईची आई))
१. प्रेमळ : ‘ती सर्वांशीच प्रेमाने बोलते. घरात कुणाला बरे नसेल, तर ती त्यांची फार आपुलकीने विचारपूस करते आणि त्यांना साहाय्य करते. ती तिच्या आजोबांना वेळच्या वेळी गोळ्या घ्यायची आठवण करून देते. इतरांना त्रास होत असल्यास ती त्यांना विभूती लावते आणि उदबत्तीने त्यांच्यावरील आवरण काढते. कुणी रडत असल्यास ती त्यांचे डोळे पुसते. ती आईला ‘परम पूज्य बाबा आहेत ना ?’, असे म्हणून आधार देते.’
सौ. स्नेहा वाघमारे (आई) आणि श्री. सुनील अन् सौ. सुलभा लोंढे ((आजोबा-आजी)(आईचे वडील आणि आई)), क्षेत्रमाहुली, जि. सातारा
१. व्यवस्थितपणा
‘अद्विका घेतलेली वस्तू पुन्हा जागेवर व्यवस्थित ठेवते. बाहेर नेलेली कुठलीही वस्तू ती न विसरता घरी घेऊन येते. घरात एखादी वस्तू सापडत नसेल, तर अद्विका ती वस्तू लगेच शोधून देते.
२. प्रगल्भता
तिची योग्य-अयोग्य जाणण्याची क्षमता चांगली आहे. तिच्या बोलण्यातील सुस्पष्टता, सत्य बोलणे आणि प्रगल्भता पाहून सर्व जण तिच्याकडे आकर्षित होतात.
३. तिला अभिनय, गायन आणि नृत्य यांची पुष्कळ आवड आहे, तसेच तिला प्राणी, झाडे अन् फुले पुष्कळ आवडतात.
४. तिची चूक झाल्यास तिला क्षमा मागायला सांगितल्यावर ती स्वतःचे कान धरून क्षमा मागते.
५. तिला रागावले किंवा मारले, तरीही ती दुसर्या क्षणाला प्रेमानेच बोलते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ
श्रद्धाचा (मावशीचा) रामनाथी आश्रमातून भ्रमणभाष आल्यावर ती श्रद्धाला म्हणते, ‘‘परम पूज्य बाबांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) भ्रमणभाष दे. मला त्यांच्याशी बोलायचे आहे. ‘ते काय सेवा करत आहेत ?’, ते मला सांग.’’ यावरून ‘तिची परात्पर गुरुदेवांना पहाण्याची तीव्र इच्छा आहे’, असे आमच्या लक्षात आले.’ (७.६.२०२१)
कु. श्रद्धा लोंढे (मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. जवळीक करणे
‘कुणी अनोळखी व्यक्ती घरी आली, तरी अद्विका अगदी सहजतेने त्यांची विचारपूस करते. त्यामुळे तिची अनेक व्यक्तींशी जवळीक झाली आहे.
२. समजंस
तिचे आई-बाबा कामानिमित्त सकाळी बाहेर पडतात. बाहेर जातांना ते तिला माझ्या आईकडे (तिच्या आजीकडे) सोडून जातात. ती एक वर्षाची असल्यापासून दिवसभर आजीकडेच रहाते. ही परिस्थिती तिने समजूतदारपणाने स्वीकारली आहे. आई-बाबा कामावर जातांना ती त्यांना अडवत नाही किंवा त्यांच्या समवेत जाण्यासाठी हट्टही करत नाही. ती दिवसभर आई-बाबांची आठवण न काढता सतत आनंदी रहाते. अनेकदा ती अन्य नातेवाइकांच्या समवेतही सहजतेने रहाते.
३. देवाची ओढ
मी घरी गेल्यावर नामजपासाठी बसते. तेव्हा ती स्वतःहून माझ्याजवळ येऊन बसते. कधी मी देवपूजा करत असेन, तर ती मला साहाय्य करते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ
अ. एकदा मी घरी गेले होते. घरातून रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघतांना मी अद्विकाला सांगितले, ‘‘मी परम पूज्यांकडे चालले आहे.’’ हे वाक्य लक्षात ठेवून अद्विका माझ्याशी भ्रमणभाषवर बोलतांना नेहमी प.पू. गुरुदेवांची विचारपूस करते.
आ. कधी कधी मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात घेऊन बसते. तेव्हा ती तिचे खेळणे बाजूला ठेवून त्या ग्रंथातील परम पूज्यांची छायाचित्रे आनंदाने पहाते. तो ग्रंथ कितीही वेळा पाहिला, तरी तिला कंटाळा येत नाही. ती पुनःपुन्हा तेवढ्याच उत्साहाने सर्व छायाचित्रे पहाते.’
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |