गूगलच्या प्ले स्टोअरवरील मनमानीला विरोध !
गूगलची दादागिरी स्वतःच्या देशातही दिसून येत आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावरूनच गूगलला लगाम घालण्यासाठी संघटित प्रयत्न झाले पाहिजे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील ३६ राज्यांनी गूगल आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गूगलच्या प्ले स्टोरवर अॅप शोधतांना गूगलकडून मर्यादित अॅप दाखवण्यात येत आहेत. अनेक आस्थापनांचे अॅप दाखवण्यात येत नाहीत. त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ‘गूगलच्या माध्यमातून अँड्रॉईड अॅप स्टोर’वर नियंत्रण ठेवणे हा देशाच्या एकाधिकारविरोधी कायद्याचे उल्लंघन आहे’, असे या राज्यांनी म्हटले आहे.
36 US states file lawsuit against Google’s app store in antitrust suithttps://t.co/6bAED4Drx2
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) July 8, 2021
न्यूयॉर्कचे अॅटॉर्नी जनरल जेम्स आणि त्यांचे सहकारी यांनी आरोप केला आहे की, अॅप विकसित करणार्यांना त्यांचे अॅप आणि अन्य साहित्य गूगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून विकण्यासाठी गूगलकडून बाध्य केले जाते अन् त्यासाठी गूगलकडून ३० टक्के कमिशन घेतले जाते.