पणजी, ४ जुलै (वार्ता.) – माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायतीसमोर भरदिवसा लोखंडी सळीने जीवघेणे आक्रमण झाले होते. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी झुवारीनगर येथे रहाणारा राम गोपाल यादव उपाख्य करीया (वय ४० वर्षे) याला कह्यात घेतले आहे. पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर आक्रमण करणार्या दोन्ही आक्रमणकर्त्यांना ओळखले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.