गुरुदेवा, तुम्हीच अवतार, ईश्वर अन् भगवान ।

सर्व साधकांचे श्रद्धास्थानी असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. शिवाजी वटकर

गुरुदेवा, तुम्हीच अवतार, ईश्वर अन् भगवान ।

गुरुदेवा, तुम्हीच (टीप १)
आशा अन् विश्वास ।
तुम्हीच धरती
अन् आकाश ।। १ ।।

तुम्हीच येणार्‍या-जाणार्‍या
श्वासात ।
तुम्हीच आमुच्या
हृदयी बसलात ।। २ ।।

तुम्हीच चंद्र, सूर्य अन् तार्‍यांत ।
तुम्हीच सनातन धर्माची प्रभात ।। ३ ।।

तुम्हीच धर्म नि धर्मरक्षिता ।
तुम्हीच राष्ट्र नि राष्ट्ररक्षिता ।। ४ ।।

तुम्हीच आमुचे श्रद्धास्थान ।
तुम्हीच अवतार, ईश्वर अन् भगवान (टीप २) ।। ५ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले.

टीप २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे.

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.१२.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक