‘एकदा एका साधिकेला आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी थंडीचे दिवस होते. त्या साधिकेला थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सद्गुरु पिंगळेकाकांनी तिची पादत्राणे हाताने उचलून तिला पायात घालण्यासाठी दिली. त्या वेळी सद्गुरु काका आम्हाला म्हणाले, ‘‘साधक हे गुरुदेवांचेच रूप आहेत. साधकांमध्ये गुरुदेवांचे निर्गुण रूप पहाता यायला हवे.’’ तेव्हा ‘मी साधकांना समजून घेण्यात पुष्कळ अल्प पडले’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे परात्पर गुरुदेवांचे सगुण रूप असलेल्या सद्गुरु काकांनाच ‘साधकांमध्ये गुरुरूप कसे पहायचे’, हे आम्हाला कृतीतून शिकवावे लागले.
‘गुरुदेव, आपल्या पावन श्री चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करते,‘ सद्गुरु पिंगळेकाकांमधील चैतन्याचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे, तसेच त्यांचे प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य असल्याने त्यानुसार माझ्याकडून कृती होऊ दे. माझ्यात तशी वृत्ती निर्माण करण्यासाठी मला शक्ती द्यावी.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र (६.१.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |