सातारा, ३० जून (वार्ता.) – जावळी तालुक्यातील १३ वर्षीय मुलीवर २८ जून या दिवशी तिच्या रहात्या घरी एकटी असल्याचा अपलाभ घेत ५० वर्षीय व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.