३१ जुलैपर्यंत सर्व राज्यांनी ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांना येत्या ३१ जुलैपर्यंत ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने याचे नियोजन करण्याविषयी काही सूचनाही केल्या आहेत.

१. न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील सर्व राज्यांनी तातडीने ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करणे पुष्कळ आवश्यक आहे. यामुळे प्रवासी कामगारांना देशाच्या कानाकोपर्‍यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

२. प्रवासी कामगारांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’ (भोजन बनवण्याची व्यवस्था) या पुढील काळातही चालू ठेवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.