पहिल्याच पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ धरणे भरली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे भरली

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत सरासरी १०५.३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५ मि.मी. पडला. जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे ३ लघु पाटबंधारे प्रकल्प (धरणे) १०० टक्के भरले आहेत, तर ९ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांचा असलेल्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये (तिलारी धरणात) २ कोटी २८ लाख घनमीटर पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे.