कोरोना विषाणूविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

कोरोना विषाणूविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभदायी ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. नामजपातून रोगप्रतिकारक शक्तीला पूरक असलेले आत्मबळ वाढते. कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांमध्ये साधनेचे आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी म्हणजेच कोरोना विषाणूचा प्रभाव स्वतःवर न होण्यासाठी किंवा झाला असल्यास तो नष्ट करण्यासाठी आध्यात्मिकदृष्टीने दुर्गादेवी, दत्त आणि शिव ही तत्त्वे आवश्यक आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करावा.

‘कोरोना विषाणूचा प्रभाव जगभर असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी हा नामजप प्रतिदिन १ माळ (४० मिनिटे) करावा. काहींना कोरोना विषाणूची लागण झाल्याची काही लक्षणे दिसल्यास आध्यात्मिक बळ अधिक प्रमाणात वाढावे, यासाठी त्यांनी हा नामजप प्रतिदिन ६ माळा (३ घंटे) करावा.

सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’चे वाचक हा नामजप मागील एक वर्षभर नियमित करत आहेत. त्यांना नामजपामुळे आत्मबळ वाढत असल्याची अनुभूती येत आहे.

नामजपातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मबळ वाढण्यासाठी होणारा आध्यात्मिक लाभ लक्षात घेऊन विविध जिल्ह्यांमध्ये १२ जून २०२१ पर्यंत ८७५ ठिकाणी हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावण्यात येत आहे. याची सूची पुढे दिली आहे.

वरील जिल्ह्यात कार्यालये, दुकाने, रुग्णालये, चिकित्सालये, कोविड केअर सेंटर, औषधालये, लॅब आणि मंदिरे आदी ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक नामजप लावण्यात येत आहे. याची सूची पुढे दिली आहे.

ईश्‍वरीकृपेने आणि सश्रद्ध समाजाच्या सहकार्याने कोरोना महामारीच्या काळात नामजपातून ईश्‍वरी चैतन्य सर्वदूर पोचत आहे. याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करून सर्वत्रचे साधक आणि जिज्ञासू यांनी नामजपाचा अधिकाधिक प्रसार करावा.

सश्रद्ध समाजाला आवाहन !

वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक साधना केल्यास समाजाला लाभ होऊ शकतो, यासाठी भारतातील सश्रद्ध समाजाने कोरोना महामारीच्या या काळात वर उल्लेख केलेला ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा यांचा एकत्रित नामजप करावा, तसेच आपले घर, कार्यालय, दुकाने, रुग्णालये, चिकित्सालये, कोविड केअर सेंटर, औषधालये, लॅब आणि मंदिरे येथे हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावून आध्यात्मिक सेवेत सहभाग नोंदवावा, ही विनंती.

हा नामजप सनातन संस्थेने ध्वनीमुद्रित केलेला असून तो आपणांस संपर्कातील सनातनच्या साधकांकडून प्राप्त केला जाऊ शकतो. आपल्याला हा ध्वनीमुद्रित नामजप न मिळाल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या भ्रमणभाषवर संपर्क करावा. तसेच ध्वनीक्षेपकावर वरील नामजप लावण्याच्या संदर्भातील उपक्रम चालू असल्यास त्याची माहिती आपल्या संपर्कातील सनातनचे साधक किंवा सौ. भाग्यश्री सावंत यांना द्यावी.

– (श्रीसत्‌शक्ति ) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२१)