मद्याचा पेला हातात घेतलेले भगवान शिवाचे ‘स्टिकर’ प्रसारित करणार्‍या इन्स्टाग्रामच्या विरोधात गुन्हा नोंद

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी देहली – सामाजिक माध्यम इन्स्टाग्रामने भगवान शिवाचे आक्षेपार्ह ‘स्टिकर’  प्रसारित केले आहे. यामुळे इन्स्टाग्रामच्या विरोधात देहलीतील धर्माभिमानी मनीष सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्यावरून पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्यांनी इन्स्टाग्रामवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चित्रामध्ये भगवान शिवाच्या एका हातात मद्याचा प्याला, तर दुसर्‍या हातात भ्रमणभाष दाखवण्यात आला आहे. हे चित्र स्टिकरच्या स्वरूपात आहे. याला ‘ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट’ (जी.आय.एफ्.) असे म्हटले जाते.
मनीष सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी अशा प्रकारचे चित्र प्रसारित केले आहे. अशा चित्रांमुळे हिंदूंमध्ये अशांतता निर्माण होऊन त्यांचा उद्रेक होऊ शकतो.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक