सांगली, ७ जून – राज्यशासनाकडील आदेशान्वये राज्यातील जिल्ह्यांना ५ स्तरांमध्ये विभागण्यात आले आहे. ३ जून या दिवशी संपलेल्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर १४.०१ टक्के आहे. यानुसार सांगली जिल्हा स्तर क्रमांक ४ मध्ये मोडत आहे. त्यामुळे ७ ते १४ जून या कालावधीत सांगली जिल्ह्यासाठी ४ थ्या स्तरातील प्रतिबंध लागू असणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घोषित केले आहे.
या आदेशातील काही गोष्टी
१. कलम १४४ लागू, संचारबंदी लागू असून जमावबंदीही लागू आहे.
२. सदर कालावधीत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.
३. किराणा, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूध आणि दुग्ध पदार्थ, बेकरी, मिठाईची दुकाने यांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ बाजार येथील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू रहातील.