१. सत्संगाच्या वेळी
१ अ. प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण असणे : ‘जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून आमच्या घरात उत्सव असल्याप्रमाणे प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण होते. सकाळी विष्णुतत्त्वाची रांगोळी काढतांना, तसेच स्वयंपाक करतांना माझी पत्नी सौ. विद्या हिला ‘आश्रमातील स्वयंपाकघरात नैवेद्याची सिद्धता करत आहे’, असे वाटत होते.
१ आ. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे : आम्ही सत्संगात सहभागी झालो. तेव्हा आम्हाला श्रीकृष्णासह गोकुळात आल्याची जाणीव झाली. आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवत होते आणि सत्संग झाल्यावरही दिवसभर चैतन्य जाणवले.
२. सत्संगानंतर
२ अ. सत्संगाला बसलेल्या खोलीच्या उत्तरेकडील भिंतीवर गुलाबी रंगात गोलाकार ठसा उमटल्याचे दिसून त्यात श्रीकृष्णाची मूर्ती दिसणे आणि पुष्कळ सकारात्मक वाटून आनंदाची अनुभूती येणे : जन्मोत्सवाच्या दुसर्या दिवशी आम्ही सत्संग ऐकण्यासाठी बसलो होतो. दुपारी ४ वाजता उत्तरेकडील भिंतीवर गुलाबी रंगात एक गोलाकार ठसा उमटलेला दिसला. त्याचे निरीक्षण केल्यावर मला त्यात श्रीकृष्णाची मूर्ती दिसली. तिच्या हातात मुरली आणि डोक्यावर मुकुट होता. ती मूर्ती थोडी तिरप्या अवस्थेत होती. ठसा गुलाबी रंगाचा असून त्याचा रंगही पक्का असल्याचे जाणवले. आजही तो ठसा भिंतीवर कायम आहे. तेथे सात्त्विक उदबत्ती लावल्यावर तिची विभूती भूमीवर चक्राकार पडली होती. दोन्हींचे छायाचित्र काढून निरीक्षण केले असता मला पुष्कळ सकारात्मक वाटले आणि आनंदाची अनुभूती आली.
श्री गुरुचरणी कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता !’
– श्री. शिरीष वसंत ओझरकर, नाशिक (२२.५.२०२०)
|