सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. अशोक पात्रीकर यांच्या सहज कृतीतून साधकाला मिळालेली शिकवण !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘डिसेंबर २०२० मध्ये एका सायंकाळी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि बाबा (पू. अशोक पात्रीकर) आश्रमात आले होते. नंतर ते भोजनासाठी भोजनगृहात आले. भोजन संपल्यावर बाजूला बसलेल्या साधकांनी लगेच त्यांची ताटे धुण्यासाठी ती घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादांनी ताट देण्यास नकार दिला आणि स्वतः ताट धुण्यासाठी उठले, तर दुसरीकडे एका साधकाने  बाबांचे (पू. पात्रीकरकाकांचे) ताट धुवायला घेतल्यावर त्यांनी ते सहजतेने त्या साधकाला दिले.

हे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘देवाला यातून काय शिकवायचे असेल ?’ चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘एका संतांकडून (सद्गुरु राजेंद्रदादांकडून) ‘ते संत असूनही स्वतःच्या सर्व कृती स्वतः करतात’, हे शिकायला मिळाले; तर दुसर्‍या संतांनी (पू. पात्रीकरकाकांनी) ताट धुवायच्या कृतीतून त्या साधकाला आनंद मिळावा, यासाठी ते त्याला सहज देऊ केले.’

परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने हा भाग मला शिकायला मिळाला. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. निखील पात्रीकर (पू. अशोक पात्रीकर यांचा पुत्र), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२१)