अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी जनतेला निवेदन द्यावे लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !  

अमली पदार्थ

‘कुडाळ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी हातपाय पसरले आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अमली पदार्थांची विक्री करणारी माणसे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. या लोकांवर पोलिसांचा वचक नाही. आपल्याला आता तरुण पिढी वाचवायची आहे. त्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलीस खात्यानेही अमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करून स्वत:चे कर्तव्य निभावावे, अशी मागणी ‘कुडाळ सजग नागरिक मंच’ने निवेदनाद्वारे कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे.’ (६.४.२०२५)