
माणसाला आधी संत कुणाला म्हणावे, हे समजत नाही. गंध, कपडे, वेशभूषा आणि विक्षिप्त वर्तन किंवा काही चमत्कार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, त्याला तो संत समजतो आणि अशा संतांच्या सहवासात राहून ‘नोकरी द्या, मूल द्या, रोग घालवा, पैसे द्या, संकट दूर करा, सत्ता-कीर्ती मिळवून द्या, शत्रूचा नाश करा’, या आणि यांसारख्या अभिलाषा पूर्ण करण्याची इच्छा करतो. क्वचित् खर्या संताची संगती लाभली, तरी वरील अभिलाषेमुळे तो तेथे फार वेळ टिकत नाही. म्हणून शंकराचार्य ‘धन्य’ व्यक्तीची व्याख्या करतांना शांत, निर्मोही, ब्रह्मनिष्ठ, अशा संतांच्या सहवासात सातत्याने राहून आत्मचिंतन करणार्याला ‘धन्य’ मानत आहेत.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘साधकाची चिंतनिका’ या ग्रंथातून)