सिंधुदुर्ग – जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे), रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान मास प्रारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम, तसेच उपोषणे, मोर्चे, निदर्शने, रस्ताबंद आंदोलन, यांसारखी आंदोलने सुरळीत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकार्यांनी १४ एप्रिल २०२१ या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षा केली जाईल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली.