अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

श्रीनगर – जूनपासून चालू होणार्‍या अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा कट जिहादी आतंकवाद्यांनी रचल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी आक्रमणांच्या घटनांत वाढ केली आहे. त्यांच्याकडून सुरक्षादलांना लक्ष्य करण्यात येत आहे. अनंतनाग, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांतून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर हे आतंकवादी त्यांचा तळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मार्गावरून अमरनाथ यात्रेसाठी जाणार्‍या यात्रेकरूंवर आणि सुरक्षादलांवर ते आक्रमण करू शकतील, असा त्यांचा डाव आहेे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रहित करण्यात आली होती, तर त्याच्या आदल्या वर्षी कलम ३७० रहित करण्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने यात्रेकरूंना माघारी पाठवण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणार्‍या या यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचा अधिक प्रयत्न होऊ शकतो.