बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या पुजार्‍याची शिरच्छेद करून हत्या !

  • उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, पुरोहित, हिंदुत्वनिष्ठ यांंच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !
  • उत्तरप्रदेशमध्ये साधू आणि पुजारी यांच्या हत्यांची शृंखला चालूच असून हा हिंदुद्वेष्ट्यांचा नियोजित कट तर नाही ना, याचे अन्वेषण होणे आवश्यक !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील शिकारपूरमध्ये अशोक कुमार नावाच्या एका पुजार्‍याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

येथील आचरू कला गावामध्ये हे मंदिर असून अशोक कुमार हे गेल्याच आठवड्यात येथे पुजारी म्हणून आले होते. २८ मार्चच्या रात्री त्यांची हत्या करण्यात आली. दुसर्‍या दिवशी सकाळी भाविक मंदिरात आल्यावर त्यांना याची माहिती मिळाली.

४ गोवंशांची हत्या

बुलंदशहराच्या निखोव गावात काही दिवसांपूर्वी आंब्याच्या बागेमध्ये ४ गोवंशांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतरही येथे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर ‘आता पुजारीची हत्या होणे यामागे कुठले षड्यंत्र आहे का ?’ असा संशय व्यक्त होत आहे.