संतांच्या सत्संगाच्या वेळी अंगावर असलेल्या कपड्यांवरच रात्री झोपल्यावर शांत झोप लागणे

‘८.१.२०१९ या दिवशी संतांच्या सत्संगानंतर महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. प्रिशा सभरवाल (वय १३ वर्षे) हिने रात्री झोपण्यापूर्वी अंगावरचे कपडे पालटले नाहीत. त्या वेळी ‘संतांच्या चैतन्याने ते कपडे भारित झाले असल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतील’, असा तिचा भाव होता. त्यानंतर मलाही त्या संतांचा सत्संग लाभला. त्या रात्री मला वरील प्रसंग आठवल्याने मीसुद्धा सत्संगाच्या वेळी अंगावर असलेले कपडे न पालटता झोपले. त्या रात्री मिळालेल्या झोपेसारखी झोप मला आजवर कधीच मिळाली नव्हती. नेहमीच्या झोपायच्या वेळेपेक्षा मी दोन घंटे उशिरा झोपूनसुद्धा दुसर्‍या दिवशी सकाळी मी लवकर उठले आणि त्या वेळी मला पुष्कळ उत्साही वाटत होते, तसेच एरव्ही माझ्या शरिराभोवती जाणवणारी नकारात्मक शक्ती मला त्या रात्री जाणवली नाही.’ – एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक