महिला पोलीस अधिकार्‍याला धमकी देत पिंपरी येथील कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न

जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशी अनैतिक कृत्य होत असतील, तर असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी काय राखणार ?

पिंपरी-चिंचवड – येथील पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्यात प्रेम प्रकरणातून अनिल निरावणे या पोलीस कॉन्स्टेबलने १ जानेवारीला रात्री ११ वाजता इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यानुसार संबंधित कॉन्स्टेबलवर आत्महत्येचा प्रयत्न आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक आणि आत्महत्या करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते; मात्र महिला अधिकारी इतरांना बोलत असल्याचा राग कॉन्स्टेबल अनिलला अनावर होत होता. याच वादातून महिला अधिकार्‍यास जिवे मारण्याची धमकी देत, कॉन्स्टेबल अनिलने आत्महत्येचा प्रयत्न केला.