‘माझ्या बाबांना त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षापासून तंबाखू खाण्याची सवय होती. आता माझ्या बाबांचे वय ८० वर्षे आहे. वर्ष २०१७ मध्ये ते आश्रमात एक आठवडा रहायला आले होते. त्या वेळी त्यांनी एकही दिवस तंबाखू खाल्ला नाही. तेव्हा मी एका संतांना त्यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीविषयी सांगितले. त्यावर ते संत म्हणाले, ‘‘तुझ्या बाबांना आश्रमात रहायला येऊ दे. सेवा करतांना आनंद मिळायला लागला की, त्यांची ही सवय सुटेल.’’ त्यानुसार वर्ष २०१९ मध्ये माझे बाबा आश्रमात रहायला आले. आरंभी ते सकाळी आणि संध्याकाळी आश्रमाच्या बाहेर जाऊन तंबाखू खात आणि तोंड धुऊन आश्रमात येत. आता दळणवळण बंदीच्या काळात, म्हणजे मार्च २०२० पासून आतापर्यंत (९ मास) त्यांना बाहेर पडणे शक्य न झाल्याने तंबाखू मिळाली नाही. तेव्हा त्यांचे तंबाखू खाणे आपोआप बंद झाले. तंबाखू खायला मिळाली नाही; म्हणून माझ्या बाबांनी माझ्याकडे कधीही तक्रार केली नाही. त्यांनी ही परिस्थिती स्वीकारली. ते म्हणाले, ‘‘सध्या माझी सवय सुटली आहे. ’’
संतांच्या संकल्पामुळे त्यांची तंबाखू खाण्याची सवय सुटली.’
– एक साधक (२०.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |