चतरा (झारखंड) येथील गावात कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा न केल्याने भुतांचा त्रास होण्याच्या भीतीने पिकांची केली नाही कापणी !

  • अंनिससारख्या संघटना याला अंधश्रद्धा ठरवून हिंदूंना अज्ञानी ठरवण्याचा प्रयत्न करतील, यात शंकाच नाही, तसेच गावकर्‍यांची कुलदेवता आणि ग्रामदेवता यांच्यावर श्रद्धा असल्याने त्यांचा मान ठेवण्याच्या गोष्टीकडे अशा संघटना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार, हेही तितकेच सत्य !
  • भुतांवर विकसित, प्रगत आणि पुरोगामी पाश्‍चात्त्य देशांत सहस्रो लोकांकडून संशोधन करण्यात येत आहे. गूगलवर याची माहितीही उपलब्ध आहे; मात्र भारतातील अतिशहाणे पुरो(अधो)गामी, ढोंगी नास्तिकतावादी याचा अभ्यास करत नाहीत, हे लक्षात घ्या !
कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा

चतरा (झारखंड) – येथील पितीज गावामध्ये कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा होत नसल्याने ‘भुतांचा त्रास होईल’, या भीतीमुळे लोकांनी उभे पिक कापण्याऐवजी तसेच सोडून दिल्याने ते नष्ट होत असल्याचे समोर आले आहे. (अशा वेळी आध्यात्मिक संघटनांनी गावकर्‍यांना साहाय्य करून तेथे कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा करून गावकर्‍यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आश्‍वस्त करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंमध्ये संघटितपणा नसल्याने आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) सामाजिक कार्यकर्ते येथे गावकर्‍यांची अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ग्रामदेवता पूजा

गावकरी संजय यादव यांनी म्हटले की, गावातील काही जण अन्य एका संप्रदायावर विश्‍वास ठेवत आहे. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये एकता नाही. यातून कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा होत नाही. त्यांची पूजा केल्याविना कापणी केली जाऊ शकत नाही. गावकर्‍यांमध्ये भीती आहे की, जर पूजा न करता कापणी केली आणि धान्य घरी नेले, तर भुतेही त्यांच्या घरी येऊन काही तरी अशुभ घडवू शकतील. अशा प्रकारच्या भीतीमुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३ वर्षे शेतीच करण्यात आली नव्हती.