भीषण आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच आवश्यकतेनुसार नेत्रतपासणी करून घ्या आणि अतिरिक्त उपनेत्र (चष्मा) बनवून घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणारे महर्षी, तसेच द्रष्टे संत यांनी भविष्यात वर्तवल्याप्रमाणे लवकरच भीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. तेव्हा नेत्रतपासणी करणे, डोळ्यांचे शस्त्रकर्म करून घेणे, तसेच ‘उपनेत्र हरवणे, त्याची काच फुटणे’ अशा समस्या उद्भवल्यास उपनेत्र बनवून घेणे कठीण होईल. त्यामुळे पूर्वीपासून उपनेत्र वापरत असलेल्या व्यक्तींनी न्यूनतम ६ मासांपूर्वी नेत्रतपासणी केली नसेल, तर तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी. मोतीबिंदू, काचबिंदू इत्यादींची शक्यता वाटत असल्यास शस्त्रकर्माच्या दृष्टीने तपासणी करून घ्यावी. केवळ एक उपनेत्र असणार्‍या व्यक्तींनी त्याच ‘नंबर’चे एक अतिरिक्त उपनेत्रही बनवून घ्यावे.

(‘पुढे भीषण आपत्काळात अन्नधान्य, पाणी, वीज अशा अनेक गोष्टींची उणीव भासू नये, यासाठी आताच पूर्वसिद्धता कशी करावी’, हे जाणून घेण्यासाठी सनातनच्या ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ या ग्रंथाचा लाभ घ्या ! )’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले