फोंडा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) अभिज्ञान, पुणे या संस्थेकडून ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोव्याच्या कु. अद्वैत चिन्मय घैसास याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. गोवा, महाराष्ट्र यांसह देश, तसेच विदेशातील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिशूवर्ग, प्राथमिक, माध्यमिक, तसेच खुला गट, अशा विविध स्तरांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. यांपैकी प्राथमिक गटात गोव्याच्या कु. अद्वैत चिन्मय घैसास याने अव्वल स्थान प्राप्त केले. कु. अद्वैत हा सरकारी प्राथमिक विद्यालय, माशेल या शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. पाठांतर, स्पष्टोच्चार, एकंदर सादरीकरण, हावभाव या निकषांवर या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत अन्य गटांतून अनुष्का गुडसूरकर, आरोही देशपांडे, पियुष कुलकर्णी, गंधार सरपोतदार, समंत बोंद्रे, ऋषिकेश हडप, जान्हवी गुडसूरकर आणि सुप्रिया वैद्य यांनी प्रावीण्य प्राप्त केले. विद्यार्थी उपक्रम आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याच्या हेतूने अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > अभिज्ञान, पुणे संस्थेकडून घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत गोव्यातील अद्वैत घैसास प्रथम
अभिज्ञान, पुणे संस्थेकडून घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत गोव्यातील अद्वैत घैसास प्रथम
नूतन लेख
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !
जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही ! – प्रवीण पवार, महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र
मोगलांचे उदात्तीकरण करणार्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजवर बंदी घाला !
राज्यात शिष्यवृत्तीचे १४ सहस्र ५७७ अर्ज प्रलंबित ! – उच्च शिक्षण सहसंचालकांची माहिती
#Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !
वृक्ष लागवड आणि संवर्धन यांसाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री