झारखंडमधील एका ग्रामपंचायतीतील संतापजनक निर्णय
रांची (झारखंड) – गुमला जिल्ह्यात अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी गावातील ग्रामपंचायतीने त्याच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर या पैशांपैकी काही रक्कम दारू आणि चिकन मेजवानीसाठी (पार्टीसाठी) खर्च करण्यात आल्याचाही आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
१. आरोपी सुनील लोहरा हा दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरी पोचला. त्या वेळी मुलगी तिच्या आईशी होती. ‘घरातील कामे पूर्ण करेपर्यंत मुलीची काळजी घेतो’, असे सांगून आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेला.
२. काही वेळाने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आई घटनास्थळी पोचली. तेव्हा मुलगी गंभीर घायाळ अवस्थेत आढळली. लैंगिक अत्याचाराचा संशय आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला आणि कुटुंबाला माहिती दिली.
३. त्यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला. याप्रकरणी ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्यात आली.
४. या बैठकीत आरोपीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आरोपीने ग्रामपंचायतीत २० सहस्र रुपये भरले, तर ‘उर्वरित ८० सहस्र रुपये एका आठवड्यात भरतो’, असे सांगितले.
५. ग्रामपंचायतीने या रकमेतील काही पैसे दारू आणि चिकन मेजवानीसाठी खर्च केले. हे समजल्यानंतर गावकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
६. गावातील एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावर पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेत पीडित मुलीच्या आईची तक्रार नोंदवली. तिच्या जबाबाच्या आधारे आरोपी सुनील लोहरा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील अन्वेषण करत आहेत.

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
धर्माच्या नावावर नद्या प्रदूषित करण्याचा कुणालाही अधिकार नाही ! : Madras High Court
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक