दीपो भक्षयते ध्वान्तं कज्जलं च प्रसूयते ।
यद् अन्नं भक्षयेत् नित्यं जायते तादृशी प्रजा ॥
अर्थ : दिवा काळोख खातो (म्हणजे नष्ट करतो) आणि काजळी निर्माण करतो. (त्याप्रमाणे आपण) नेहमी जे अन्न खातो, तशी संतती होते. उत्तम संततीसाठी माता-पिता यांनी सात्त्विक आहार घ्यावा.