ब्रिटिशांनी (ख्रिस्त्यांनी) भारतात रोवलेली धर्मांतरांची मुळे !

रामनाथी, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनात मुंबई येथील सौ. मीनाक्षी शरण यांनी ‘भारतातील धर्मांतराची मुळे’, याविषयी मांडलेले विचार येथे देत आहोत.

प्रतिकात्मक छायाचित्र

इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी आणि हिंदु धर्म संपवण्याचे रचलेले षड्यंत्र !

माझी वैदिक संस्कृती मी हिंदु असण्यापासून प्रारंभ होते. जेव्हा इंग्रजी शाळा प्रथम वर्ष १८८३ मध्ये बंगालमध्ये चालू झाली, तेव्हा मेकॉले याने असे म्हटले होते की, ‘३० वर्षांच्या आत संपूर्ण भारतात एकही जण मूर्तीपूजा करणारा रहाणार नाही.’ दुसरा लॉर्ड कॅनिंग होता, ज्याने वर्ष १८०० मध्ये असे म्हटले होते की, ‘एकदा हिंदु धर्म संपला की, भारतियांची राष्ट्रीय भावना संपेल. त्यानंतर त्यांच्यावर राज्य करणे सोपे जाईल.’ आपण या २ गोष्टींवरून समजू शकतो की, आपल्यासंदर्भात काय काय घडले ? ही गोष्ट कुठून चालू होते ? आणि ती कुठे येऊन संपते ?

बालवयातच भारतावर परकियांनी केलेल्या आक्रमणाचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत होणे

वर्ष १८३० मध्ये असे म्हटले गेले होते की, ‘एकही मूर्तीपूजक वाचणार नाही’; पण आजही मूर्तीपूजक आहेत. आपल्या सभ्यतेची मुळे कापून काढण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु सर्वांत मोठी गोष्ट जी आपण पुष्कळ चांगल्या पद्धतीने जाणत आहोत ती ही की, सर्वांत प्रथम अलेक्झांडरने आक्रमण केले. त्यानंतर वर्ष ६३८ मध्ये इस्लामी आक्रमणे चालू झाली आणि त्यानंतर पोर्तुगीज अन् ब्रिटीश यांनी भारतावर आक्रमण केले. असे असूनही आपण १ सहस्र वर्षे लढत होतो. माझे माता-पिता स्वतःला दोष देत होते. जीवनात धक्के खात होते आणि कसेबसे स्वतःची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा ते सुस्थितीत येत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मुलांना आधुनिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. यासाठी मला एका मिशनरी शाळेत म्हणजेच इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी पाठवले. मी ५ वी किंवा ६ वी इयत्तेत असतांना एकदा माझे मामा हिंदूंची मजबूत मुळे (पुस्तके) माझ्यासाठी घेऊन आले होते. मी एका सुसंस्कृत आणि यज्ञ संस्कृती जोपासणार्‍या घराण्यातील मुलगी होते; पण माझी लक्षणे पाहून मामा एकदम घाबरले अन् मला त्यांनी काही विशिष्ट योद्ध्यांच्या गोष्टींची पुस्तके भेट दिली. त्या वेळी त्यांनी मला म्हटले की, ‘पुढील वर्षी मी येईन, तेव्हा तू हे सर्व वाचून समजून घेतलेले असले पाहिजे.’ हे सर्व माझ्या समजण्यापलीकडचे होते.

सौ. मीनाक्षी शरण

मी ७ व्या इयत्तेत असतांना मला ‘योगानंद यांचे आत्मचरित्र’ (‘ऑटोबायोग्राफी ऑफ योगी’) दिले गेले आणि मला अशा प्रकारची पुस्तके प्रत्येक वर्षी मिळू लागली. मला सातत्याने असे सांगितले जायचे की, ‘पुढच्या वेळी मी येईन, तेव्हा मी याविषयी प्रश्न विचारणार आहे.’ असे करता करता ८ व्या किंवा ९ इयत्तेत गेल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला आणि तेव्हापासून मी ते पुन्हा वाचायला चालू केले. तेव्हापासून मी जे वाचन चालू केले, ते मनापासून केले. मी अलेक्झांडरपासून, इस्लाम, पोर्तुगीज ते नेहरू-गांधी यांच्यापर्यंत पुष्कळ इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसच्या अधिवेशनात तत्कालीन अध्यक्षांनीच ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर आक्षेप घेणे; पण त्याला विरोध होणे

मुस्लिम लीग वर्ष १९०६ मध्ये निर्माण झाली. त्याच्या जवळपास काँग्रेसचे प्रत्येक अधिवेशन ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाऊनच आरंभ होत असे. वर्ष १९२० मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर आक्षेप घेतला होता. त्या वेळी त्यांनी असे म्हटले होते की, ‘येथे ‘वन्दे मातरम्’ गायले जाणार नाही.’ त्या वेळी दिगंबर पलुस्कर यांनी उभे राहून सांगितले होते की, ‘हे काही धार्मिक व्यासपीठ नाही. ते गीत देशाशी संबंधित आहे आणि येथे देशाविषयी गोष्ट होत आहे, राष्ट्राची गोष्ट होत आहे. येथे मी ‘वन्दे मातरम्’ अवश्य गाणार आणि आपल्याला जे करायचे ते अवश्य करा. आपल्याला जर एवढा आक्षेप होता, तर आपण आपल्या शपथविधी प्रसंगी याला अनुमती कशी दिली ?’ तेव्हापासून ‘वन्दे मातरम्’वर आघात चालू झाले.

काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘वन्दे मातरम्’मधील देवीचे नाव असलेली कडवे वगळून त्याला दुय्यम बनवणे

काँग्रेसने पुढे जाऊन आज आपण जे ‘वन्दे मातरम्’ म्हणतो, त्यामध्ये केवळ १-२ कडवी ठेवून बाकीची सर्व कडवी काढून टाकली. कडवी यासाठी काढली की, तेथे ईश्वराचे नाव येते. जेथे देवीचे अथवा मातेचे नाव येते, ते सर्व काढले आणि ‘तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही आता गाऊ शकता’, असा पर्याय दिला. त्यामुळेच ‘वन्दे मातरम्’ला दुय्यम बनवले गेले. त्याचा परिणाम जो झाला, तो आपणा सर्वांसमोर आहे. तेव्हाही मुसलमानांनी ‘वन्दे मातरम्’ म्हटले नाही आणि आजही ते म्हणायला सिद्ध नाहीत. त्यांनी तेव्हाही ‘भारत माता की जय’ म्हटले नाही आणि आजही ‘भारत माता की जय’ म्हणायला ते सिद्ध नाहीत; कारण ते तिला आपली माता मानतच नाहीत. आपण मानतो तशी ते भारताला पुण्यभूमी मानत नाहीत, मातृभूमी मानत नाहीत. तेव्हा हेसुद्धा ठरले की, ‘हिंदी’ हीच राष्ट्रभाषा होईल. तेव्हासुद्धा काँग्रेसने तेथेही आडकाठी आणली आणि म्हटले की, ‘आपण तिला सोपी करू शकतो. आपण तिला ‘हिंदुस्थानी’ करू शकतो.’  ‘हिंदुस्थानी’ ही उर्दू आणि हिंदी यांचे मिश्रण होती.

युरोपमधील ख्रिस्त्यांची स्थिती !

पहिल्या शतकात जे भारतीय व्यापारी होते, ते लाल समुद्राच्या (रेड सी) मार्गाने स्वतःचा माल घेऊन विक्रीसाठी रोमपर्यंत जात असत. दुसर्‍या शतकात आपल्याकडे मौर्य सम्राट होते, ते नौदल युद्ध प्रकारात निपुण होते. सध्या जो उत्तर आणि पश्चिम युरोपचा परिचय आहे, तेथील लोक त्या वेळी असभ्य अन् संस्कृतीहीन होते, तसेच ते आपापसांत लढत असत आणि ते सर्व ख्रिस्ती धर्मीय होते. ख्रिस्त्यांचे बायबल म्हणते की, पृथ्वी सपाट आहे. ‘आपण समुद्रात दूर दूर जात राहिला, तर पृथ्वी सपाट असल्यामुळे पृथ्वीवरून खाली पडायला होईल’, असे त्यांना भय वाटत असे. अशी त्यांची स्थिती होती.

इस्लामच्या पूर्वी अरबांनी प्रारंभी ज्यू, पर्शिया यांच्यावर आणि नंतर भारतावर आक्रमण करणे आणि त्यांच्या विरोधात हिंदूंनी दिलेला लढा

इस्लामच्या पूर्वीचे जे अरब होते, तेसुद्धा त्यांचा माल घेऊन विक्रीसाठी रोममध्ये जात असत; पण ते एवढे कष्ट घेऊ इच्छित नसल्याने लूटमार करायचे. ते समुद्री लुटारूच होते. त्यांनी वर्ष ६२२ पासून ६३० पर्यंत ६४ ‘गजवे’ (आतंकवादी प्रकाराला ‘गजवा’ म्हणतात.) केले होते. ६४ गजवा आक्रमणे अरब लोकांनी आधीच या जगावर केली होती, त्यामध्ये वर्ष ६२९ मध्ये ज्यूंवर आक्रमण झाले होते. वर्ष ६३४ मध्ये पर्शियावर आक्रमण केले आणि वर्ष ६३८ पासून त्यांनी भारताचा दरवाजा खटखटायला आरंभ केला. वर्ष ६३८ पासून वर्ष ७१२ पर्यंत म्हणजे ७४ वर्षे ते सिंधला हरवू शकले नाहीत आणि भारतात प्रवेश करू शकले नाहीत. पर्शिया १७ वर्षांत हरून संपूर्ण इस्लामी झाले होते. वर्ष ६३८ पासून ते वर्ष २०१९ पर्यंत हिंदू आहेत आणि आपल्यातील जे कमकुवत अन् क्षीण होते अथवा अन्य कारणामुळे ते ख्रिस्ती आणि मुसलमान या रूपाने या देशात आहेत. ‘आपण हिंदु आहोत’, याचा अभिमान बाळगा आणि मी सुद्धा  हिंदूंचा अभिमान बाळगते. मी त्या ‘डीएन्ए’पासून आले आहे, ज्या ‘डीएनए’ने आजपर्यंत लढा दिला आणि आजही लढत आहेत. ते आज स्वतःचा कामधंदा सोडूनसुद्धा लढण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या कष्टाने कमावलेला पैसा हिंदूंनी ४ पट, १० पट अशा ‘जिझिया’ कराच्या रूपात मुसलमान राज्यकर्त्यांना दिला, तो केवळ आपले स्वतःचे हिंदुत्व राखण्यासाठी ! आपण आपल्या हिंदूंमध्ये जागृती आणि सतर्कता आणायला पाहिजे. अशा प्रकारचे बळ आणायला पाहिजे की, तुम्ही ज्या (हिंदु) डीएन्एला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात, तो आजपर्यंत उभाच आहे. जे कमकुवत झाले नाही, जे कधीही हरले नाही.

चर्चने राज्य वाढवण्यासाठी तलवारीच्या टोकावर लोकांचे धर्मांतर करण्याची अनुमती देणे

पहिल्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत जो युरोप आहे, तेथील सर्व राज्यांवर चर्च नियंत्रण करत असे. चर्च त्यांना संपूर्ण हक्क देत असे की, ते कोणालाही भेटत असतील, तर त्यांनी कशाही प्रकारे तलवारीच्या टोकावर किंवा अन्य कोणत्याही प्रकारे आपले राज्य वाढवण्यासाठी लोकांचे धर्मांतर करत रहावे.

युरोपमध्ये नियम मोडणार्‍याला शिक्षा देण्याचे कार्य राज्यांचे असणे; पण त्यासाठी चर्चने राज्यांना अधिकार देणे

जेव्हा जेव्हा आपण साम्यवाद शब्द ऐकतो, तो सर्व चर्चचा अधिकार म्हणवला जात होता. युरोपमध्ये जर कुणी नियम झुगारून दिला, कोणताही नियम तोडला, तर त्यांना शिक्षा देण्याचे जे कार्य आहे, त्यांना दंड करण्याचे जे कार्य आहे, ते त्या राज्याचे असे. चर्च यामध्ये आपले हात बरबटून घेत नसे. ते राज्यांना सरळ सरळ संमती देत असे की, तुम्ही त्यांना दंड करायचा आहे. तो दंड ‘त्या व्यक्तीला जिवंत जाळून किंवा त्याला मरेपर्यंत यातना देऊन’, अशा २ मुख्य पद्धतींनी दिला जात असे. १५ व्या शतकापर्यंत हे थकलेले युरोप ख्रिस्ती झाले होते.

आर्थिक प्रगतीसाठी ख्रिस्त्यांनी हिंदुस्थानचा मार्ग शोधणे आणि त्याद्वारेही ख्रिस्त्यांनी खोटा इतिहास पसरवणे

१४ व्या शतकात ख्रिस्त्यांच्या आर्थिक प्रगतीला आरंभ झाला. इस्लाम युरोपच्या दिशेने वाढत होता. तेव्हा या लोकांना धोका जाणवू लागला आणि लक्षात आले की, आपल्याला व्यापार करण्यासाठी हिंदुस्थानचा मार्ग शोधला पाहिजे. वर्ष १४१८ मध्ये प्रिन्स हेंद्रीने २-४ नौका येथे पाठवायला चालू केल्या. वर्ष १४५३ मध्ये पोपने त्यांना पाठिंबा दिला. वर्ष १४९८ मध्ये वास्को द गामा याने येथे (भारतात) पाय ठेवला. आपण नेहमी वाचत आलो की, वास्को द गामाने भारताचा शोध लावला. भारत तर आधीपासूनच होता, तर तो कसला शोध लावणार ?

क्रांती झालेल्या राज्यांना ‘साम्यवादी राज्य’ (चर्चपासून मुक्त) म्हटले जाणे

१५ व्या शतकात चर्च एक महत्त्वाची गोष्ट होती. वर्ष १५४० मध्ये चर्चने एक समिती बनवली आणि तिला ‘द गव्हर्मेंट ऑफ चर्च मिलिटेन्स’, असे म्हटले जाते. तोपर्यंत जी राज्ये झाली होती, त्यांची क्रांती होऊन ती स्वतंत्र झाली होती. त्यामुळे त्यांना ‘साम्यवादी राज्य’ म्हटले जायचे. साम्यवादी राज्य म्हटले गेले; कारण ते चर्चपासून मुक्त झाले होते. मलबार (केरळ) आणि गोवा येथे येऊन त्यांनी वर्ष १५४० मध्ये सेंट पॉलच्या नावाने पहिले ‘सेमिनार होली स्कूल’ उघडले, त्याचा आम्ही आजपर्यंत त्रास भोगत आहोत. ख्रिस्त्यांनी तमिळनाडूमधील त्रिचंदुरच्या ११ वर्षांच्या एका मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते हरले, तेव्हा त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचे वाचन करून काही प्रकरणांचे एक ‘ट्रिटाइज’ (वैशिष्ट्य) लिहिले. ते आपण सोशल मिडियावर पाहू शकतो.

ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक हिंदूंमध्ये द्रविड आणि आर्य भेद करून भांडणे लावून देणे अन् ती आतापर्यंत चालू असणे

आपण स्वतःच द्रविड आणि आर्य असा भेद करून एकमेकांत सामाजिक माध्यमांत (सोशल मिडियावर) लढत आहोत. आपण हे लक्षात घ्यायला हवे की, जेव्हा ब्रिटीश आले, तेव्हा त्यांनी आपली विद्यापिठे रहित केली आणि आजसुद्धा आम्हाला हिंदूंना अभ्यास करायचा असेल, आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर धार्मिक अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा कुणी हिंदु येऊन सामाजिक माध्यमांत लढाई करतो, तो अर्थात्च गूगलवर जातो. तिथे त्याला भाषांतर केलेली ‘मनुस्मृति’ मिळते. वर्ष १७९४ मध्ये संस्कृत अभ्यासक विलियम जोन्स यांनी ती भाषांतर केली होती. ती ५ वा वेद म्हणून वर्ष १६०१ मध्ये रॉबर्ट या एका इटलीच्या व्यक्तीने भाषांतर केली होती. १८ व्या शतकात रॉबर्ट क्लाइव्हने ‘द्रविडी’ ही ओळख निर्माण केली होती. आपणच विचार करावा की, ही ओळख एवढ्या वर्षांपासून निर्माण केलेली आहे. ती आमच्या पद्धतीमध्ये घुसडली गेली आहे आणि आम्हाला त्याचे मूळ ठाऊक नाही. आम्हाला त्यांना प्रतिकार करायचे ठाऊक नाही, आम्ही केवळ ते शोधतो. आम्ही ती शोधून द्रविडी याच्याविषयी लढतो.

हिंदूंच्या विभाजनासाठी इंग्रजांनी भारतात जातीनिहाय जनगणना चालू करणे

सर्वांत धोकादायक खेळ आमच्याशी खेळला गेला आहे आणि तो आहे जातीभेदाचा ! ज्यामुळे आम्ही आजही रडत आहोत. वर्ष १९०१ मध्ये जी जनगणना केली गेली, ती इंग्रज अधिकारी हबर्ट होप रिस्लीची खेळी आहे. हबर्ट होप रिस्ली याच्या कायद्याचे आम्ही आजही पालन करत आहोत. (भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊन गेली, तरी ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याचे आतापर्यंत पालन होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक) बंगालमध्ये प्रथम साहाय्यक पदे रिकामी असायची. त्यांनी आमच्या नाकाची लांबी आणि उंची मोजून त्यापासून आम्हाला जातीभेदात विभाजित केले. हिंदु डिएन्ए अजून आहे. तो पुन्हा मूळ रूपात आणायला फार कठीण होणार नाही. आम्हाला केवळ आपल्या या रेषांना (जातीभेदाच्या) दूर करायचे आहे. एवढे दूर करायचे आहे की, आपल्या स्मृतीतून ती गोष्ट निघून गेली पाहिजे.

मनातील अनावश्यक विचार नष्ट करण्यासाठी नामजप आवश्यक ! – सौ. मीनाक्षी शरण

जसे एका ‘हार्डडिस्क’मध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम भरले, तर जोपर्यंत आपण ते रिकामे करत नाही, तोपर्यंत नवीन माहिती त्यात भरू शकत नाही. तसेच जेव्हा आपण नामजप करतो, तेव्हा दूरचित्रवाहिनी आणि सोशल मिडिया यांवर पाहिलेला कचरा, तसेच जेवढा म्हणून अनावश्यक आमच्या डोक्यात (मनामध्ये) भरला आहे, त्यात नामजप भरल्यावर तो कचरा आपोआप निघून जाईल.


सौ. मीनाक्षी शरण यांचा परिचय

सौ. मीनाक्षी शरण या मुंबई येथील आहेत. त्यांनी हिंदूंचा इतिहास, हिंदूंची संस्कृती आणि त्यांचे रक्षण या विषयावर ‘esamskriti.com’ हे संकेतस्थळ चालू केले आहे. तसेच त्या ‘ब्लॉग’च्या माध्यमातूनही लेखन करतात. त्याचसह त्या भारतीय हस्तकलेला उभारी देण्याचे कार्यही करतात. त्या साधनाही करतात. त्या अनेक देशांमध्ये भ्रमण करतात आणि प्रत्येक ठिकाणी हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे संवर्धन होण्यासाठी सक्रीय आहेत. व्यावहारिक जीवनात व्यस्त असूनही धर्माप्रती श्रद्धा आणि तळमळ असल्यामुळे त्या नियमितपणे अध्ययन करून लोकांमध्ये हिंदु धर्म अन् संस्कृती यांविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

____________________________