केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांचा आरोप
आतंकवादी कसाब जिवंत सापडल्याने हिंदु आतंकवादाचे कथानक उधळले गेल्याचाही केला दावा
(आय.एस्.आय म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – पाकिस्तानची आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा

नवी देहली – मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ च्या म्हणजेच २६/११ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी आरोप केला की, हे आक्रमण काँग्रेस आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय. यांच्यातील एक ‘फिक्स मॅच’ (आधी ठरवण्यात आलेली घटना) होती. जर पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर या आक्रमणाचे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) ‘हिंदु आतंकवादा’कडे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकला असता.
‘हिंदु आतंकवादा’चा कोणताही गुन्हा कधी नोंदवण्यात आला नव्हता !
मणी यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आरोप करतांना म्हटले की, वर्ष २००६ मध्ये दिग्विजय सिंह यांनी माझ्याकडे हिंदु आतंकवादाशी संबंधित प्रकरणांची माहिती मागितली होती; परंतु त्या वेळी गृह मंत्रालयाच्या नोंदींमध्ये असा कोणतीही खटला नोंदवलेला नव्हता. वर्ष २०१० पर्यंत मंत्रालयाच्या अधिकृत नोंदींमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा कोणताही शब्द अस्तित्वात नव्हता.
पहा →Hindu Terror Origin, 26/11 Attacks, Ishrat Jahan Case, Malegaon Blast, Beant Singh| RVS Mani |EP-431(सौजन्य : ANI News) |
इशरत जहाँ प्रकरणात मोदी आणि शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला !
मणी यांनी आतंकवादी इशरत जहाँ प्रकरणाचाही उल्लेख करत दावा केला की, त्या घटनेमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात होता.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman