रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉर्पोरेट जिहाद नक्की सत्य काय ?’ या विषयावर विशेष संवाद

रत्नागिरी, १५ जून (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’चे हे संकट आता आपल्या घरापर्यंत पोचले आहे, तरी आपण एवढे षंढ कसे ? अजून काय घडायला पाहिजे, म्हणजे आपण जागृत होऊ ? हिंदु मुली, महिला यांच्यावरील अत्याचार, धर्मांतर, हत्या हे अत्यंत मोठ्या प्रमाणात होत असूनही हिंदूंना अजूनही शत्रूबोध नाही. कुणाकडून काय घ्यायचे ? हे आम्हाला कळत नाही. आपण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे जिहाद्यांना या सगळ्यासाठी पुरवण्यात येणारा पैसा हा ‘हलाल अर्थव्यवस्थे’तून कमवला जात आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी हलाल प्रमाणपत्र असलेले साहित्य अत्यंत डोळसपणे नाकारण्याची वेळ आली आहे, असे ठाम मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मांडले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ हे अभियान चालू करण्यात आले आहे. या अभियानाच्या अंतर्गत शहरातील जयेश मंगल पार्क येथे १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॉर्पोरेट जिहाद नक्की सत्य काय ?’ या विषयावर विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिव्या घाग हिने केले. या कार्यक्रमाला ७०० जण उपस्थित होते.
Halal Economy Fuels Every Jihad; It must be dismantled!- @Ramesh_hjs National Spokesperson @HinduJagrutiOrg
At a special dialogue on “Corporate Jihad: What is the Truth?” in Ratnagiri, Ramesh Shinde shared his views on the halal economy, cultural identity, and social challenges… pic.twitter.com/WU5zH5E2Ht
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2026
या कार्यक्रमाला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि सनातन संस्थेच्या पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सांगता पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांनी म्हटलेल्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,
१. ‘लव्ह जिहाद’चे हे संकट पूर्वीपासून आहे. ५ पातशाह्यांविरोधात लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, देहाचे अतोनात हाल पत्करले; पण धर्म न सोडणारे छत्रपती संभाजी महाराज, स्वतःचा देह शत्रूच्या हाती लागू नये यासाठी सहस्रो रजपूत स्त्रियांनी केलेला जोहार, अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.
२. ही उदाहरणे हिंदु धर्मावर वेळोवेळी आलेली संकटे दर्शवतात. या संकटांतून आपल्यावर एवढे अत्याचार झाले आहेत की, हिंदु मुली मुसलमानांच्या प्रेमात पडतातच कशा ?, असा प्रश्न निर्माण होतो.
३. महिला या राष्ट्राचा आधार आहे. आई जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, अशी अनेक उदाहणे आपण देऊ शकतो.
एखादा तरी शौर्याचा शृंगार करा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’ केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित नसून आता सर्वच क्षेत्रांत आहे. ते एखादी मुलगी किंवा महिलेपुरते मर्यादित नसून हिंदु वंश, हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र माहिती नसल्याने बळी पडलेली माझी मुलगी नाही, बहीण नाही या मानसिकतेने आपण दुर्लक्ष करतो, हे अत्यंत धोकादायक आहे. हिंदु धर्मात महिलांच्या कपाळावरील कुंकू म्हणजे शक्तितत्त्वाची, तर पुरुषांच्या कपाळावरील टिळा लावणे म्हणजे स्वत:तील शिवतत्त्वाची जागृती होय. त्यामुळे यापुढे शृंगार करा; परंतु एक तरी शौर्याचा शृंगार करा. हे शौर्य जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून ठिकठिकाणी विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षणवर्ग घेतले जातात. त्याचाही आपण अवश्य लाभ घ्या !
लव्ह जिहादमध्ये अडकणार्या मुलीशी धर्मबंधुत्व आहे, या विचाराने रस्त्यावर उतरा ! – अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत

ते हिजाब घालून येतात आपण कुंकू लावण्याचे का सोडले ? नोकरीत नमाज पढण्यासाठी वेळ काढतात, तर मग आपण प्रार्थना, स्तोत्र यासाठी वेळ का काढत नाही ? लक्षात घेऊया आपण आधी धर्माला सोडतो आणि त्यामुळे धर्म आपल्याला सोडतो. आज मुलींध्ये थोडा अहंकार, स्वाभिमान हवा. अर्थात् तो घरातील व्यक्ती, वडीलधारी यांसमोर नको, तर जिहाद्यांसमोर असू दे. जेव्हा एखादा जिहादी हिंदु मुलीची छेड काढतो, त्या वेळी ‘त्याच्या मनात हे आलेच कसे ?’, या विचाराने मुलीने आक्रमक व्हायला हवे. मुलांना हिंदुत्वाचा विचार जन्मतःच द्या. धर्म प्रतिदिनच्या जीवनात रुजवायला प्रारंभ करा. समाजातील एखादी मुलगी किंवा महिला ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकत असेल, त्या वेळी तिच्याशी माझे धर्मबंधुत्वाचे नाते आहे, या विचाराने त्या व्यक्तीसाठी रस्त्यावर उतरायला हवे.

उपस्थित मान्यवर
या वेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, श्री मरुधर विष्णु समाज सेवा समितीचे अध्यक्ष श्री. रमेश माळी, उद्योजक श्री. दीपकसिंह देवल, श्री. सुनील सहस्रबुद्धे, श्री. अनिल देवळे, सौ. उमा देवळे, श्री. अमितराज खटावकर, कुवारबाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेश तोडणकर, कार्याध्यक्ष श्री. हितेंद्र पटेल, गो सेवा संघ, रत्नागिरीचे श्री. सुशील कदम, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. प्रभाकर खानविलकर, क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे, पटेल समाजाचे अध्यक्ष श्री. ईश्वर भाई पटेल, चित्पावन ब्राह्मण साहाय्यक संघाचे श्री. राजन पटवर्धन,
हिंदुत्वनिष्ठ श्री. चंद्रकांत राऊळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, राजापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. विवेक गुरव, लांजा येथील अधिवक्ता श्री. रूपेश गांगण, भैरूलाल भंडारी, लांजा वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. मनोहर तथा दादा रणदिवे, रा.स्व. संघाचे श्री. गजानन करमरकर, पावस श्रीराममंदिरचे श्रीकांत तथा आबा चिपळूणकर, श्री. वसंत नेने, श्री. विजयकुमार शिंदे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. दीपक जोशी, अधिवक्ता श्री. सचिन रेमणे, किर्तनसंध्याचे श्री. उमेश आंबर्डेकर, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. तन्मय जाधव, पतंजली योग सेवा समितीचे श्री. विनय साने, नगरसेविका सौ. प्रीती सुर्वे, सौ. मेधा कुलकर्णी. फुपेरेचे उदय सावंत आदी उपस्थित होते.
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम