स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि सामाजिक कार्याचा प्रभावी आविष्कार
‘क्रांतीची धगधगती ज्वाला !’ मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीकारी जीवनकार्याला कलात्मक अभिवादन !

रत्नागिरी, १२ जुलै – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला !’ या विशेष संगीत, नृत्य आणि नाट्यमय कार्यक्रमाचे आयोजन १५ जुलै २०२६ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मराठा भवन हॉल, जिल्हा परिषदेजवळ, माळनाका, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतीकारी विचार, साहित्यनिर्मिती आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभावी कलात्मक आविष्कार रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, अंदमानातील सेल्युलर कारागृहातील संघर्ष, रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य, साहित्यसंपदा आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम अधिवक्ता आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार
दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !
मोशी (पुणे) येथील दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू !
जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीचा केंद्रीभूत अवतार ! – मुकुंद दातार, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक