मध्यप्रदेशात असलेल्या या विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेने दिली प्रस्तावाला स्वीकृती
सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे विधेयक बनवण्यासाठी जाणार विद्यापिठाचा प्रस्ताव
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील ‘बरकतउल्ला विद्यापिठा’चे नाव पालटण्याची मागणी अनेक वर्षांपासून हिंदु संघटनांकडून केली जात आहे. आता या विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेने विद्यापिठाचे नाव पालटून ते ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ असे करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव आता राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडे आणि नंतर सरकारकडे पाठवला जाईल. विधानमंडळात या नामांतरावर विधेयक सादर करून ते संमत झाल्यावर राज्यपालांकडून नामांतर अंतिम केले जाईल.
Barkatullah University in Madhya Pradesh will be renamed "Vagdevi Bhojpal University", days after the High Court recognised Bhojshala as the Temple of Vagdevi.
But restoring Bharat's civilizational identity cannot be limited to renaming one university, village, or city at a… pic.twitter.com/MDR3nD278R
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 5, 2026
परिषदेच्या बैठकीत असा युक्तीवाद करण्यात आला की, राजा भोज यांचे नाव राज्याच्या ऐतिहासिक आणि बौद्धिक वारशाचे प्रतीक आहे. विद्यापीठ कार्यकारी परिषदेतील सदस्या डॉ. ताहिरा अब्बासी यांनी या निर्णयाला विरोध करत म्हटले की, विद्यापिठाचे सध्याचे नाव स्वातंत्र्यसैनिक बरकतउल्ला भोपाली यांच्या स्मृतीशी जोडलेले आहे. ते पालटणे योग्य ठरणार नाही. (मुसलमान कुठेही आणि कोणत्याही पदावर गेले, तरी ते प्रथम मुसलमान असतात, असे जे म्हटले जाते, त्याचे हे उदाहरण ! – संपादक)
काँग्रेसच्या मुसलमानप्रेमाचा अंत ! – भाजप
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र शर्मा शिवपुरी यांनी या नामांतरावर टोमणा मारत म्हटले की, वर्ष १९८८ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी केलेल्या तुष्टीकरणाचा या नामांतराच्या माध्यमातून अंत होईल.
हिंदु संघटनांनी व्यक्त केला आनंद !
या प्रकरणी ‘श्री हिंदु उत्सव समिती’ आणि ‘संस्कृती बचाव मंच’ यांनी आनंद व्यक्त केला. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले, ‘‘ही मागणी बर्याच काळापासून केली जात होती. ती आता पूर्ण होतांना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणांची नावे अशी आहेत, जी पालटून देशभक्त आणि क्रांतीकारक यांच्या नावावर ठेवली गेली पाहिजेत.’’
विद्यापिठाच्या शैक्षणिक रचनेतही पालट !
केवळ नावच नाही, तर विद्यापिठाच्या शैक्षणिक रचनेतही पालट निश्चित करण्यात आले आहेत. अरबी आणि पर्शियन यांसारख्या पारंपरिक विषयांना एकत्र आणून ‘तुलनात्मक भाषा आणि संस्कृती विभाग’ म्हणून पुनर्रचना केली जाईल.

हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !