हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या गुरुदेवांना नमन !


वैशिष्ट्यपूर्ण प्रसारफलक !

धर्माचरण आणि साधना यांनी प्राप्त होणारे आध्यात्मिक बळ हेच आज राष्ट्रापुढील प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी ऊर्जा पुरवू शकते. ‘धर्मशिक्षण देणे’ हे सनातन संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यज्ञस्थळीही सभागृहातील मंडपाच्या वरील भागात ‘देवीची उपासना कशी करावी ?’ या विषयीचे वैशिष्ट्यपूर्ण फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला !


‘सनातन प्रभात’ नियतकालिके कक्ष !

हिंदु राष्ट्रासाठी, म्हणजे रामराज्याच्या स्थापनेसाठी, तसेच येणार्‍या आपत्काळात तरून जाण्यासाठी यज्ञाच्या माध्यामातून श्री राजमातंगीदेवीची उपासना केली आणि त्याच यज्ञस्थळी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशानेच कार्यरत असणार्‍या अन् सनातन यज्ञसंस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा प्रसार करण्यात आला !


हिंदु जनजागृती समिती प्रदर्शनकक्ष !

भारतराष्ट्राला रामराज्य स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी महायज्ञाचे आयोजन आणि त्या ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा केला प्रसार !


आपत्काळासाठी गुरुदेवांनी दिली ग्रंथसंजीवनी !

आपत्काळात तरून जाण्यासाठी आयुर्वेदीय औषधी आणि घराच्या परसबागेत लावलेली झाडेच उपयोगी ठरणार आहेत. ‘ही झाडे कशी लावायची ?’ यांविषयीची माहिती सांगणारे ज्ञान संकलित केलेले ग्रंथ आणि काही वनस्पती यांविषयी माहिती घेतांना यज्ञासाठी आलेल्या भाविक महिला !


सनातनच्या ग्रंथांचा प्रदर्शनकक्ष !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी विपुल ग्रंथलेखन केले असून  ३७० हून अधिक ग्रंथांच्या १३ भाषांतील १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. यज्ञस्थळी ठेवलेले हे ग्रंथ पहातांना जिज्ञासू !


भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांचे महायज्ञासाठी सक्रीय साहाय्य !

नगरसेवक प्रकाश गंगाधरे

मुंबईमध्ये १७ मे या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञ यशस्वीरित्या पार पडला. हा महायज्ञ मुंबईमध्ये करण्याचे निश्चित झाल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांची भेट घडवून आणणे, त्यांना यज्ञाची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करणे, विविध प्रशासकीय अनुमत्या लवकर मिळाव्यात, यासाठी साहाय्य करणे यांसह अन्य प्रकारे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी या सोहळ्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले, तसेच पत्नी सौ. आशा गंगाधरे आणि कन्या अधिवक्त्या (सौ.) अक्षदा काळे यांसह यज्ञाचे सहयजमान म्हणून ते या यज्ञकार्यात सहभागी झाले होते.


प्रदर्शनकक्षांद्वारे धर्मप्रसार !

यज्ञस्थळी उभारण्यात आलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जीवनदर्शनी कक्ष, नियतकालिके, ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, व्यक्तिमत्त्वविकास, आध्यात्मिक उपाय, तसेच अग्निहोत्र कक्ष, देवता अन् धार्मिक कक्ष, गुरुकृपायोग कक्ष, सोरटी सोमनाथ येथील मूळ शिवलिंगाचे दिव्यांश दर्शन कक्ष आदी १५ वैशिष्ट्यपूर्ण कक्षांना जिज्ञासूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला !


मुंबईत ‘शंखनाद महोत्सव’ केल्यासारखीच फलनिष्पत्ती श्री राजमातंगी महायज्ञातून मिळाली आहे !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीत श्री राजमातंगी महायज्ञाविषयी गौरव दर्शवणारा केलेला उल्लेख ! 

‘श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने आणि श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ परिपूर्ण झाला. याची साक्ष म्हणजे यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यांसह झालेला पाऊस ! ‘हा पाऊस जर मुंबईत यज्ञस्थळी झाला असता, तर यज्ञाला उपस्थित असलेल्या सर्वांना घरी पोचणे कठीण झाले असते’, हे ओळखून भगवंताने पावसाची दिशा वळवली. पाऊस पडत असतांना झालेला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, ही देवलोकात आनंद झाल्यावर वाजवण्यात येणार्‍या मंगल वाद्यांची प्रचिती आहे. देवतांनी यज्ञ स्वीकारल्याचा हा संकेत आहे. देशाच्या रक्षणासाठी करण्यात आलेला हा यज्ञ म्हणजे एक प्रकारे महामृत्यूंजय यज्ञच होता; कारण त्या माध्यमातून गुरुदेवांनी युद्धकाळासाठी साधकांना आवश्यक असलेले मृत्यूंजय कवच दिले आणि राष्ट्रालाही कवच प्रदान केले. ‘शंखनाद महोत्सव’ केल्यासारखीच फलनिष्पत्ती या यज्ञातून मिळाली.’ (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेले सप्तर्षी जीवनाडीवाचन, १८.५.२०२६)


शक्तिसमवेत येऊन यज्ञाला परिपूर्णता प्रदान करणारे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्यांश !

सोरटी सोमनाथ येथील १ सहस्रांहून अधिक वर्षे जपून ठेवलेल्या मूळ ज्योतिर्लिंगाच्या दिव्यांशांचे दर्शन भाविकांना देतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ