‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
तपोभूमी भारताला सध्याच्या युद्धकाळात संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. १७ मे २०२६ या दिवशी प्रभादेवी, मुंबई येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७.४५ या वेळेत हा चैतन्यमय महायज्ञ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला. या चैतन्यदायी महायज्ञाचा ७ सहस्रांहून अधिक हिंदूंनी प्रत्यक्ष, तसेच ४० देशांतील लोकांनी ‘ऑनलाईन’ स्वरूपात (लाईव्हस्ट्रिमद्वारे) आध्यात्मिक स्तरावर लाभ घेतला.

‘गोवा येथील सनातनच्या आश्रमात हा महायज्ञ ‘ऑनलाईन’ स्वरूपात पहाणार्या सौ. अनुश्री साळुंखे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) या साधिकेच्या कुंडलिनीचक्रांवर यज्ञाचा काय परिणाम झाला ?’, याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अभ्यास करण्यात आला. यासाठी ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप १) या वैज्ञानिक उपकरणाने त्या साधिकेच्या यज्ञ आरंभ होण्यापूर्वी (दुपारी २.४९ वाजता) आणि यज्ञ ३.४५ वाजता आरंभ झाल्यावर २ घंट्यांनी (दुपारी ५.४५ वाजता) मोजणीच्या नोंदी घेण्यात आल्या. या उपकरणाद्वारे व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती अभ्यासता येते.

टीप १- ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाची माहिती![]() रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो-वेल’ हे उपकरण बनवले आहे. व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली यात वापरलेली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका एका सेकंदापेक्षाही अल्प कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून ‘फोटॉन’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ या अतीसूक्ष्म कणांच्या होणार्या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्या ‘फोटॉन’ कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र आणि तिची कुंडलिनीचक्रे यांची माहिती मिळते. |
१. ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रातील सप्तचक्रांचा आकार आणि स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे
![]()
१ अ. चक्राचा आकार : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या संगणकीय चित्रातील एखाद्या चक्राचा आकार योग्य असणे, म्हणजे त्या चक्राशी संबंधित अवयवांना त्या चक्राकडून योग्य प्रमाणात सूक्ष्म ऊर्जेचा पुरवठा होत असणे होय.
१ आ. चक्राची स्थिती : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये चक्र मध्यरेषेवर किंवा तिच्या जवळ असणे, म्हणजे चक्राची स्थिती ‘संतुलित’ असणे होय.
१ इ. चक्रांचे कार्य : सामान्यतः मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही खालची ३ चक्रे व्यक्तीला शारीरिक कार्यासाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात, तर अनाहत, विशुद्ध, आज्ञा अन् सहस्रार ही वरील ४ चक्रे व्यक्तीला मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात.
१ ई. व्यक्तीची डावी आणि उजवी बाजू यांचे कार्य : योगशास्त्रानुसार व्यक्तीच्या डाव्या बाजूला इडा किंवा चंद्रनाडी आणि उजव्या बाजूला पिंगला किंवा सूर्यनाडी असते. चंद्रनाडी शीतल, तर सूर्यनाडी प्रखर असते. व्यक्तीची डावी बाजू सूक्ष्मातील कार्यासाठी, तर उजवी बाजू स्थुलातील कार्यासाठी पूरक असते.

१ ए. चक्र मध्यरेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असणे : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये एखादे चक्र मध्यरेषेच्या डावीकडे असणे, म्हणजे ते चक्र अकार्यरत (निर्गुण स्थितीत) असणे किंवा अंतर्मुखता आली असणे, तसेच एखादे चक्र मध्यरेषेच्या उजवीकडे असणे, म्हणजे ते चक्र कार्यरत (सगुण स्थितीत) असणे किंवा बहिर्मुखता आली असणे.
२. ‘साधिकेने ऑनलाईन महायज्ञाचे थेट प्रक्षेपण पहाणे’, याचा तिच्या प्रत्येक चक्रावर झालेल्या परिणामांचा केलेला तुलनात्मक अभ्यास
या प्रयोगामध्ये ‘व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती कशी होती ?’ हे कळावे, यासाठी महायज्ञ आरंभ होण्यापूर्वी आणि नंतर ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपलेली संगणकीय चित्रे पुढीलप्रमाणे आहेत. या चित्रांत वरून खाली या क्रमाने १. सहस्रार, २. आज्ञा, ३. विशुद्ध, ४. अनाहत, ५. मणिपूर, ६. स्वाधिष्ठान आणि ७. मूलाधार ही चक्रे दर्शवली आहेत.


३. केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून सार रूपात मांडलेली सूत्रे आणि त्यांचे आध्यात्मिक विश्लेषण

३ अ. श्री राजमातंगी महायज्ञाला आरंभ झाल्यानंतर २ घंट्यांनी साधिकेच्या कुंडलिनीचक्रांमध्ये झालेले पालट
३ अ १. सातपैकी ६ चक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे : महायज्ञातून प्रक्षेपित झालेले चैतन्य साधिकेच्या चक्रांनी ग्रहण केल्यामुळे महायज्ञापूर्वी मध्यरेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असलेल्या ७ चक्रांपैकी ६ चक्रे मध्यरेषेलगत आली. ही चक्रे सुषुम्ना नाडीच्या अगदी जवळ आल्यामुळे ती ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनली. हा श्री राजमातंगी महायज्ञाचा दिसून आलेला पुष्कळ चांगला परिणाम आहे.
३ अ २. अनाहतचक्र वगळता अन्य सर्व चक्रांचा आकार वाढणे : महायज्ञातून प्रक्षेपित झालेले चैतन्य साधिकेच्या चक्रांनी ग्रहण केल्यामुळे तिच्या चक्रांना ऊर्जा मिळून तिचे अनाहतचक्र वगळून अन्य ६ चक्रांचा आकार वाढला.

३ अ ३. अनाहतचक्राचा आकार न्यून होऊन ते अकार्यरत होण्याचे कारण : अनाहतचक्र हे व्यक्तीच्या भावना किंवा भाव यांच्याशी संबंधित असते. महायज्ञाला आरंभ होण्याआधी प्रयोगाला आल्यावर साधिकेने तिच्या मनात आलेले विचार लिहून दिले. ते पुढीलप्रमाणे होते.
अ. ‘प्रयोगाची वेळ झाली, तरी प्रयोगाचे ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ यंत्र चालू होत नव्हते. त्या वेळी ‘देवा, प्रयोग व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. मोजणीच्या नोंदी नीट घेता येऊ दे’, असे विचार माझ्या मनात येत होते. नंतर यंत्र वेळेत चालू झाले, तेव्हा ‘देवाचीच कृपा, यंत्र सुरू झाले’, असा विचार माझ्या मनात आला.
आ. उद्या सकाळच्या अल्पाहार सेवेची आज संध्याकाळी पूर्वसिद्धता करण्यासाठी मला जायचे होते; पण मी प्रयोगाला असल्यामुळे माझ्याऐवजी एका साधकाला सेवेला जायला सांगितले होते. त्यामुळे माझ्या मनात ‘ज्या साधकाला मी सेवेला जायला सांगितले आहे, तो जाईल ना ?’, हा चिंतेचा विचार माझ्या मनात आला.
इ. ‘दुपारी महायज्ञासाठी यायच्या गडबडीत मी घरी दूध शीतकपाटात न ठेवता ओट्यावर तसेच विसरले’, हे मला अकस्मात् आठवले, तेव्हा ‘देवा, आता तूच काय ते बघ !’, अशी मी प्रार्थना केली.
ई. ‘एका शारीरिक त्रासासाठी मला डॉक्टरांकडे जायचे होते. ‘मी त्यांच्याकडे कधी जाऊ ?’, असा विचारही माझ्या मनात आला.’
– सौ. अनुश्री साळुंखे (१७.५.२०२६)
या चिंतेच्या विचारांमुळे यज्ञापूर्वी साधिकेचे अनाहतचक्र भावनाशील झाले होते. भावनाशील विचारांचा परिणाम अनाहतचक्रावर होऊन त्यावर त्रासदायक आवरण येते. यज्ञाला आरंभ झाल्यावर मात्र साधिकेचे लक्ष यज्ञावर केंद्रित झाल्यामुळे तिच्या मनातील चिंतेचे विचार दूर होऊन, तसेच यज्ञातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम होऊन साधिकेच्या अनाहतचक्रावरील त्रासदायक आवरण दूर झाले. त्यामुळे तिच्या अनाहतचक्राचा आकार न्यून झाला, तसेच यज्ञावर लक्ष केंद्रित झाल्याने साधिकेचे अनाहतचक्र अंतर्मुख झाले. अंतर्मुखतेमुळे साधिकेचे अनाहतचक्र अकार्यरत झाले.
३ अ ३ अ. महायज्ञ चालू असतांनाची साधिकेच्या मनाची स्थिती : महायज्ञ पहात असतांना साधिका अंतर्मुख झाली होती. ‘तेव्हा साधिकेचे मन आध्यात्मिक भावाशी निगडित होते’, हे तिच्या पुढील अनुभूतींतून लक्षात येते.
१. ‘माझ्यातच श्री राजमातंगीदेवी आहे’, असे मधे मधे मला जाणवत होते. त्यामुळे तेव्हा मी स्वतःला सजलेल्या देवीच्या सुंदर रूपात अनुभवत होते.
२. माझा श्वासोच्छ्वास आणि नामजप हे दोन्ही एका लयीत होत होते.’
– सौ. अनुश्री साळुंखे (१७.५.२०२६)
४. सारांशरूपाने निष्कर्ष
अ. साधिका अनेक वर्षे आश्रमात राहून साधना करत आहे. तिला आध्यात्मिक त्रास नाही. तसेच तिची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे. त्यामुळे श्री राजमातंगी महायज्ञाचा परिणाम साधिकेच्या सर्व चक्रांवर पुष्कळ चांगल्या प्रकारे झाला.
आ. साधिकेने महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यावर मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यांशी संबंधित साधिकेची वरील ३ चक्रे, तसेच शारीरिक कार्यांशी संबंधित खालील ३ चक्रे मध्यरेषेच्या लगत येऊन ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यास पूरक बनली.
इ. साधिकेचे मन अंतर्मुख झाल्याने तिचे अनाहतचक्र अकार्यरत झाले.
यावरून ‘श्री राजमातंगी महायज्ञामुळे साधिकेच्या दैनंदिन व्यावहारिक, तसेच आध्यात्मिक कार्यांतील यशस्वीता किती वाढली असणार’, हे लक्षात येते. या महायज्ञामुळे यज्ञाचा एक हेतू असलेली ‘भारताची सर्वांगीण अभिवृद्धी’, कशी साध्य होऊ शकते, हे वरील प्रयोगातून दिसून आले आहे.’
– डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.५.२०२६)

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !