एका ओळीवरून जगद्गुरु संत तुकोबा समजणार असतील, तर उरलेले साडेचार सहस्र अभंग कशासाठी ? संत तुकाराम महाराज यांचे साडेचार सहस्रांहून अधिक अभंग उपलब्ध आहेत. त्यात विठ्ठलभक्ती, हरिनाम, रामकृष्ण हरि, नामस्मरण, सदाचार, प्रयत्नवाद आणि आत्मोन्नती यांचा अखंड संदेश आहे; पण आज काही मंडळी ‘अल्ला देवे अल्ला दिलावे’, या एका अभंगातील केवळ पहिली ओळ पुढे करून संत तुकोबांना इस्लामचे किंवा तथाकथित सर्वधर्मसमभावाचे प्रवक्ते म्हणून मांडू पहात आहेत.
१. एकतर्फी सर्वधर्मसमभाव नेमका कुणासाठी ?
मग काही सरळ प्रश्न विचारायलाच हवेत… संपूर्ण अभंग का सांगितला जात नाही ? ‘भजनगोली एक ही सार’ ही ओळ का लपवली जाते ? संदर्भ तोडून संतांचे विचार पालटण्याचा अधिकार कुणी दिला आहे ? संत तुकोबांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर एका ओळीतून नव्हे, तर संपूर्ण गाथेतून समजून घ्यायला हवा. वारी सर्वांसाठी खुली आहे; पण तिचा आत्मा पालटण्यासाठी नाही.
वारीत कुणाला यायचे असेल, तर अवश्य यावे. विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. वारकर्यांसह चालावे. हरिनामाचा गजर करावा; पण वारीत येऊन विठ्ठलभक्तीच्या ऐवजी इतर धार्मिक घोषणांचा आग्रह धरणे, संतांच्या अभंगांचा संदर्भ तोडून वेगळाच अर्थ लावणे किंवा वारकरी परंपरेचा मूळ आशय पालटण्याचा प्रयत्न करणे, हे स्वीकारले जाऊ शकत नाही.
आणि एक साधा प्रश्न… उद्या वारकर्यांनी मशिदीत जाऊन अभंग, हरिपाठ किंवा ‘रामकृष्ण हरि’चा गजर करायचे ठरवले, तर ते तेवढ्याच आनंदाने स्वीकारले जाईल का ? मग हा एकतर्फी सर्वधर्मसमभाव नेमका कुणासाठी ?
२. वारकरी संप्रदायाच्या नेतृत्वाचे मौन का ?
आज सर्वाधिक वेदना एका गोष्टीची वाटते. ज्या वारकरी परंपरेने महाराष्ट्राला शतकानुशतके आध्यात्मिक दिशा दिली, ज्या संतांनी राजांनाही प्रसंगी उपदेश केला, त्या परंपरेचे प्रतिनिधी आज विशिष्ट राजकीय विचारधारेच्या लोकांकरवी आपल्या परंपरेचा विपर्यास होत असतांना स्पष्ट भूमिका घेतांना दिसत नाहीत. वारकरी संप्रदायाचा पाया विठ्ठलभक्ती आहे. त्याची व्याख्या बाहेरचे लोक करणार आणि आपण शांत बसणार ? हा प्रश्न द्वेषाचा नाही, सत्याचा आहे.
कुणाच्याही श्रद्धेचा अपमान करण्याचा हेतू नाही; पण संतवाङ्मयाचा संदर्भ तोडून वारकरी परंपरेत वेगळे धार्मिक किंवा वैचारिक संदेश मिसळण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यावर प्रश्न विचारणे, हा प्रत्येक वारकर्याचा अधिकार आणि कर्तव्य आहे. संत तुकोबांना समजून घ्यायचे असेल, तर एका ओळीने नव्हे, तर साडेचार सहस्र अभंगांनी समजून घ्यावे. वारीचे पावित्र्य जपावे. संत आणि संतवाङ्मयाचा विपर्यास थांबवावा.
(साभार : ‘Dasrp Edihb’ या फेसबुकवरून)

‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक